कोरोना : राज्यात कोराना रूग्ण संख्येत लक्षणीय वाढ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । जून महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी दिवसभरातून तब्बत ४ हजार ४ रूग्ण आढळून आले आहे. यात अधिक रूग्ण मुंबईतील असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा चौथ्या लाटेला सुरूवात झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रूग्ण संख्येत मोठी वाढ होतांना दिसून येत आहे. आतापर्यंत राज्यात ७७ लाख ६४ हजार ११७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. सध्या राज्यात २३ हजार ७४६ जण कोरोना बाधित आहेत. यामध्ये मुंबईतील ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण आहेत. गेल्या २४ तासात राज्यात एकुण ४ हजार ४ रूग्ण आढळून आले, तसेच ३ हजार ८५ रूग्ण बरे होवू घरी परतले आहे यात मात्र गेल्या २४ तासात १५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पाठोपाठ दिल्लीतही रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या नव्या माहितीनुसार देशभरात सध्या ७२ हजार ४७४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या किंचित घसरली आहे. नागरीकांनी कोरोना नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Protected Content