Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना योद्धे नगरसेवक राजेंद्र महाजन यांचा सत्कार

रावेर, प्रतिनिधी । येथे कोरोना योद्धा नगरसेवक राजेंद्र रामदास महाजन यांचा सत्कार डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केला आहे.

रावेर पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक राजेंद्र महाजन यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना नगरसेवक महाजन यांनी सल्ला दिला आहे की, प्रत्येकाने मास्क लावून, सोशल डिस्टन्स पाळणे,विनाकारण बाहेर जाणे टाळावे. दररोज सकाळी गरम पाण्यात हळद टाकून पिणे,काळा आयुर्वेदिक चहा घेणे, त्यात अद्रक,कलेमीरे, दालचिनी, तुळशी पाने, लिंबू रस असे टाकून दिवसातून ४ ते ५ वेळा चहा पिणे. रात्री झोपताना हळद दूध गरम गरम घेणे. विशेष म्हणजे कोरोना झाल्यास घाबरू नये ,जास्त विचार न करता,वरील प्रयोग करणे कोरोना केव्हा निघून पळून जाईल माहीत सुद्धा होणार नाही असा अनुभव महाजन यांनी सांगितला.

Exit mobile version