Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना योद्धा शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे

 

जळगाव, प्रतिनिधी । शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना करण्यात आली.

कोरोना काळात आघाडीवर असणारे घटक मग ते आरोग्यासाठी असणारे डॉक्टर्स, नर्सेस,स्वच्छता कर्मचारी, पोलीस आदी त्यानंतर हाय रिस्क गटातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर न्यायालयिन कर्मचारी, जजेस, वकिल, पत्रकार यांना प्राधान्य देण्यात आले. पण दुर्दैवाने शिक्षकांना मात्र ही लस देण्यात आली नाही. लॉकडाऊन काळात शिक्षकांनी शासनाने निर्देशीत केलले सर्व कार्य तत्पतरतेने पार पाडले जसे रेशन दुकानावर ड्युटी, क्वारंटाइन झोन मधील ड्युटी, सर्वेक्षण,महामार्गवरील ड्युटी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण अशा अनेक शासनाच्या कामांना शिक्षकांनी तत्परतेने पार पडले आहे. ज्या प्रमाणे डॉक्टर,नर्स, कर्मचारी,यांना कोरोना योद्धा म्हणून आपण लस देण्यासाठी प्राधान्य दिले त्याच पद्धतीने या कोरोना लढाईमध्ये शिक्षकांनी सुद्धा आपली भूमिका तत्परतेने पार पाडली आहे. म्हणून आपण शिक्षकांना सुद्धा लस मिळणेसाठी प्राधान्य द्यावे व  लवकरच जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना लस देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे तसेच राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडीतील महानगर अध्यक्ष हेमंत सोनार, कार्याध्यक्ष मनोज भालेराव, उपाध्यक्ष विजय विसपूते, महानगर सचिव प्रवीण धनगर यांच्यातर्फे  निवेदनातून देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी निवेदन मंजुर करून लवकरच शिक्षकांना लस देण्यात येईल असे याप्रसंगी सांगितले.

 

Exit mobile version