Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना युध्दात लढणाऱ्या योध्दांचा साई निर्मल फाऊंडेशनतर्फे होणार सन्मान

भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूंच्या संक्रमणापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून तहान भुक विसरून अहोरात्र परिश्रम करून कोरोना विषाणूचा समूळ नायनाट व्हावा म्हणून ‘सेवा हेच कर्तव्य’ ही ब्रीद मनात ठेवून निस्वार्थपणे जनतेच्या संरक्षण करणाऱ्यांचा शहरातील साई निर्मल फाऊंडेशनतर्फे सन्मान करण्यात येणार आहे.

यांचा होणार सत्कार
डॉक्टर्स, पोलीस प्रशासन, परिचारिका, आरोग्यसेवक, आशासेविका, स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटना., समाज सेवक, अध्यात्मिक संस्था संघटना, अध्यात्मिक गुरु संत-महात्मे, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकार, विविध कंपन्या, उद्योगपती, राजकीय लोकप्रतिनिधी कार्यकर्ते, सरकारी व खाजगी बँका, सहकारी सोसायटी, महिला, युवक, ज्येष्ठ मंडळी, शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, शेतकरी, विविध शैक्षणिक संस्था, शिक्षक या साऱ्या कोरोना विषाणूच्या कायम मुळासकट नायनाट करण्यासाठी लढा देणाऱ्या योद्ध्यांचा साई निर्मल फाउंडेशन भुसावळतर्फे या हजारो सर्व वीर योद्धांना कर्मवीर पुरस्कार 2020 हा पुरस्कार ई – सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

विश्व सेवा परमो धर्म यास आमच्या संस्थेच्या ब्रीद वाक्यानुसार आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो म्हणून सामाजिकतेची जाण आणि बांधिलकीची जपणूक करावी. कोरोनाव्हायरसच्या लढ्यात लढणारे या सर्व वीरांच्या पंखामध्ये बळ व नवचैतन्य निर्माण व्हावे, त्यापासून इतरांना प्रेरणा म्हणून तेही या लढ्यात सहभागी व्हावेत. या उदात्त हेतू आणि उद्देशाने साई निर्मल फाउंडेशन यांचे संस्थापक अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी ही संकल्पना राबवण्याचे ठरविले. ही संकल्पना संपूर्ण शक्य तेवढ्या ठिकाणी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण सर्व स्तरावर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. आपल्या देशात राज्यामध्ये गावात, शहरात, स्थानिक स्तरावर जे जे विविध स्तरावर तील, क्षेत्रातील लोक या दिव्य कार्यासाठी पुढे येत आहेत. अशा सर्वांची नावे, पद हुद्दा त्यांचे व्हाट्सअप नंबर, संस्थाध्यक्ष- शिशिर जावळे 9325147700, प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर आनंदा पाटील 97667 66888, सहप्रकल्प प्रमुख – नरेंद्र मधुकर बऱ्हाटे 7588614924 यांच्या दिलेल्या संपर्क नंबरवरती पाठवावीत. त्यानंतर संस्थेची कोर टीम प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना ई-सन्मान पत्राद्वारे सन्मानित करणार आहेत अशी माहीती संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Exit mobile version