Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण ; अरविंद केजरीवालांची घोषणा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनामुळे मृत्यू झाला तर कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत व  ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले त्यांना वयाच्या २५व्या वर्षापर्यंत महिना २५०० रुपये पेन्शन आणि मोफत शिक्षण दिलं जाईल”, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे

 

महाराष्ट्राप्रमाणेच देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढते आहे. दिल्लीमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांना जीव देखील गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा वाढू लागलेला असताना दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. .   आप्तस्वकीयांना गमावलेल्या व्यक्तींना, विशेषत: पालक गमावलेल्या मुलांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

 

 

 

पतीचं निधन झालं असेल, तर ही पेन्शन पत्नीला मिळेल. जर पत्नीचं निधन झालं असेल, तर पेन्शन पतीला मिळेल. एखाद्या अविवाहित व्यक्तीचं निधन झालं तर ही पेन्शन पालकांना मिळेल”, असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

 

 

, ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचं केजरीवाल यांनी यावेळी जाहीर केलं. एका पालकाचं आधीच निधन झालेलं असताना दुसऱ्या पालकाचं कोरोनामुळे निधन झाल्यास अशा विद्यार्थ्यांचा देखील या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांना वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत दिल्ली सरकारकडून २५०० रुपये प्रतिमहिना पेन्शन स्वरूपात दिले जातील.

 

 

सोमवारी दिवसभरात दिल्लीमध्ये ४ हजार ५२४ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. ५ एप्रिलपासून म्हणजेच गेल्या दीड महिन्यानंतर ही सर्वात कमी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.

 

Exit mobile version