Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : मालवाहू वाहनांना आरटीओकडून प्रमाणपत्र अनिवार्य

बुलडाणा, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या सर्व मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतूक करता यावी, म्हणून प्रमाणपत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात येणार आहे.

अनुषंगाने अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक‍ करण्याबाबतचे प्रमाणपत्र वाहन चालकाने वाहनासोबत ठेवावे. वाहन मालकाने सदर वाहनाचे कागदपत्रांची छायांकित प्रत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास सादर करावी. वाहनमालकांनी  mh@mahatranccom.in सदर कार्यालयाच्या या इमेल आयडीवर अर्ज केल्यास त्यांना ईमेलवर प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. जेणेकरून संबंधित कार्यालयात गर्दी होणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

Exit mobile version