Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १८ मृत्यूंची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १८ मृत्यूंची नोंद झाली असून ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ६८१७ झाली आहे. तर मृतांची संख्या ३०१ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 

देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्यापही यश मिळालेले नाही. दुसरीकडे देशातील कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या २४ हजार ५०६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ५७ जणांचा मृत्यू तर १४२९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत आढळलेल्या २४ हजार ५०६ जणांपैकी १८ हजार ६६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ७७५ झाली आहे.

Exit mobile version