Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २२५ वर !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून आकडा २२५ वर पोहचला आहे. यामुळे आता भारतातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ हजार २५३ झाली आहे.

 

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा एक हजार २५१ वर पोहोचला आहे, तर ३२ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. आज (मंगळवार) आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आणखी नवीन पाच करोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईत १, पुण्यात २ तर बुलढाण्या २ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र आर्थिक कोंडी अडकला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्राने २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज मंजुर करावे, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Exit mobile version