Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : मनपा गटनेते अनंत जोशी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र !

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी ७ दिवसांसाठी जळगाव शहरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, काही नागरिक व रिकामटेकडे तरुण याकडे कानाडोळा करून शहारत विनाकारण फिरतच आहेत. याला कटांळून महापालिका शिवसेना गटनेता अनंत जोशी यांनी जिल्हाधिकारी राऊत यांना पत्र लिहिले आहे. वाचा त्यांचे पत्र त्यांच्याच शब्दांत… !

माननीय जिल्हाधिकारी साहेब,  पत्रास कारण की …आता पुन्हा एकदा संपूर्ण बंद केलेच आहे तर आता परिस्थिति बघून पुढे महिना पंधरा दिवस कडकडीत बंद राहुच दया..कारण काही लोकांना सूचना, नियम, अटी, नाही कळत…. त्या काही लोकांमुळे इतरांना त्रास होतो…आणि परत परत उघड़ बंद करण्या पेक्षा राहू दया. आता कडकडीत बंद ..बघू काही दिवस हिरवा भाजीपाला न खाल्याने किती लोकांची प्रकृती बिघड़ते.. रोज रोज किराणा दुकानाबाहेर रांगा न लावल्याने किती जीव जातात…विनाकारण भटकणारे जर घरात थांबले तर जग बुड़ते का …साहेब ? आपल्या या देशात सिग्नल वर पोलीस नसेल तर अनेक लोक सिग्नल तोड़तात आणि त्यांच्या चुकीमुळे अपघात होतात. इतरांनाही त्रास होतो…सिग्नल त्यांच्या सुरक्षेसाठी आहे हे त्यांना नाही कळत…सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस असेल तरच सिग्नल चे नियम पळतात…. विचित्र मानसिकता आहे इथे अनेककांची ….त्यामुळे आपल्यालाच क़ाय ती काळजी घ्यावी लागेल ……

अनंत जोशी

Exit mobile version