Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : भारतात १० हजारहून अधिक कोरोना रूग्ण; देशभरात ३९२ मृत्यूंची नोंद

मुंबई वृत्तसंस्था । करोना विषाणूचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात येत नाही असे चित्र दिसून येत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. काल दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली असून १०१९७ वर पोहोचली आहे. देशभरात ३९२ मृत्यूंची नोंद झाली आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव कमी व्हावा यासाठी देशपातळीवरून अनेक उपाययोजन राबविण्यात येत आहे. यासारखे जगातील सर्व देशांना सामना करावा लागत आहे. जगभरात करोनामुळे एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लागण झालेल्यांची संख्या २० लाख १५ हजार ५७१ इतकी आहे. केवळ युरोपमध्ये १० लाख तीन हजार २८४ जणांना लागण झाली असून ८४ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version