Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना ; भारताचा आकडा ४३ लाख ७० हजार

नवी दिल्ली , वृत्तसंस्था / देशात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील बाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे बाधित आढळले असून, १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील बाधितांची एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहचली आहे.

देशभरातील ४३ लाख ७० हजार १२९ बाधितांमध्ये ८ लाख ९७ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ३३ लाख ९८ हजार ८४५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ७३ हजार ८९० जणांच्या संख्येचा समावेश आहे. .
देशभरात ८ सप्टेंबरपर्यंत ५,१८,०४,६७७ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील ११ लाख ५४ हजार ५४९ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. .

दरम्यान, कोरोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या AZD1222 या लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version