Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : बोदवड येथे पोलिसांचे सोशल डिस्टन्स

बोदवड, प्रतिनिधी । पंतप्रधान मोदी यांनी एकवीस दिवस लॉकडाऊन जाहीर केले असून त्यास काही नागरीकांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तर काही लोक जास्तीचे गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येत आहे. तर पोलिसांतर्फे लॉकडाऊनमध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा व्यवस्थीत मिळाव्यात यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

बोदवड शहरात लॉकडाऊनला काही नागरिक गांभीर्याने घेत नसून ते गल्लोगल्ली घोळका करून मजेत गप्पा मारताना दिसत होते. तर काही दुपारच्या वेळी शेतात पार्ट्या बनवण्यासाठी जात होते. व्यापारी वर्गाने शहरात मोठ्या प्रमाणात दुकाने बंद ठेवलीअसून जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने उघडे होते. यात मेडिकल,भाजीपाला,किराणा दुकान या जीवनावश्यक वस्तू विक्री ची दुकाने सुरू होती. शहरामध्ये फवारणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. प्रत्येक गल्लोगल्ली नगरपंचायतचे सफाई कर्मचारी मोठया प्रमाणात कसरत करून स्वच्छता मोहीम राबविण्यात मग्न आहे. शहरातील कचऱ्याचे संकलन केले जात आहे. त्यामध्ये शहरात स्वच्छता पाळा व घरातच राहा बाहेर कोणी फिरू नये असे आवाहन नगरपंचायतीच्या मुख्यधिकारी यांच्या कडून केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी लागू झाली आहे. यामुळे शहरातील काही भागात अवैध दारू विक्रीला महापूर आला आहे. सम्पूर्ण भारतात लॉकडाऊनला कुठल्याच प्रकारे गांभीर्याने घेतले जात नसल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी लागू झाली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता शासनाने सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बोदवड शहरात अवैध दारू विक्रीला जणू महापूरच आलेला आहे. शहरातील मलकापूर रोड,जामठी रस्त्यावर, मुक्ताईनगर रस्त्यावर, यासह विविध भागात सर्रास दारू विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे मूळ किंमतीपेक्षा दारू कमी भावात विकली जात असल्यामुळे ती बनावट असल्याचे स्पष्ट आहे. भविष्यात यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 पोलिसांची सतर्कता
कोरोनासंसर्गाच्या खबरदारीसाठी पोलिसांचे सोशल डिस्टन्स इन मेडिकल, दूध डेअरी समोरील ग्राहकांसाठी विशेष उपाय योजना करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासकीय यंत्रणा परिश्रम घेत आहेत. तेथे एक पाऊल पुढे येत शहरातील मेडिकल दूध डेअरीसमोर होणाऱ्या गर्दीतून संसर्ग टाळण्यासाठी बोदवड पोलिस विभागाच्या वतीने सोशल डिस्टनशी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून पोलीस विभागाच्या वतीने ग्राहकांसाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शहरातील मेडिकल दुकानदार मालकांनी स्वतः पुढाकार घेऊन सोशल डिस्टन्स चौकटी आखून सहभाग घ्यावा असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील खरे यांनी केले आहे मेडिकल,भाजीपाला,किराणा दुकान या जीवनावश्यक वस्तू विक्री ची दुकाने सुरू होती.

Exit mobile version