Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : बुलढाणा येथे निरीक्षणखालील नागरिकांमध्ये १ ने वाढ

बुलडाणा, प्रतिनिधी । येथे घरामध्ये स्वतंत्र निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांमध्ये १ ने वाढ होऊन ती संख्या ५७ झाली आहे. काल ही संख्या ५६ होती अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ५७ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. काल ही संख्या ५६ होती यात आज एक नवीन नागरिकांची भर झाली असून ही संख्या ५७ झाली आहे. या ५७ पैकी घरात स्वतंत्र खोलीत निरीक्षणात १४ दिवस पूर्ण केलेले नाही. यामुळे एकही नागरिकांची निरिक्षणातून मुक्त करण्यात आलेली नाही. स्त्री रुग्णालयात दोघे निरीक्षणाखाली आहेत. तर संशयीत म्हणून बुलडाणा आयसोलेशन कक्षात २ नागरिक आहेत. नागपूर प्रयोगशाळेत २ swab नमुने पाठविण्यात आले आहेत. नागपूर येथून १ रिपोर्ट प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आहे.

Exit mobile version