Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : बुलढाणा जिल्ह्यात आज दिवसभरात ३५ बाधित रूग्ण आढळले; १४८ रूग्ण झाले बरे

बुलढाणा , प्रतिनिधी   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३  हजार १००   अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३   हजार ६५   अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३५  अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १९   व रॅपीड टेस्टमधील १६  अहवालांचा समावेश आहे.  निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ३३३   तर रॅपिड टेस्टमधील २ हजार ७ ३२   अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे  ३  हजार ६५   अहवाल निगेटीव्ह आहेत.

 

तालुकानिहाय आजची आकडेवारी 

बुलडाणा शहर : ७ , बुलडाणा तालुका : पळसखेड भट १, शिरपूर १,  संग्रामपूर तालुका : कुंभारखेड १,    चिखली शहर : २,  चिखली तालुका : पिंपळगाव १, सवणा १,  तेल्हारा २, शेलगाव जहागीर २, अंत्री खेडेकर १, मंगरूळ नवघरे २ , एकलारा १, करवंड १,   मेहकर तालुका : सोनाटी १,   जळगाव जामोद शहर : ७, जळगाव जामोद तालुका : आसलगाव १ ,   लोणार तालुका : बिबी २, पिंप्री खंडारे १   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात ३५  रूग्ण आढळले आहे.

 त्याचप्रमाणे उपचारादरम्यान जानेफळ ता. मेहकर येथील ३९  वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज १४८  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.  जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६ हजार ४३   कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८५ हजार २५०  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात १४३  कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६५०  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

Exit mobile version