Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना बाधीत पोलिसाच्या संपर्कातील कपाऊंडर पॉझिटिव्ह

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील टाकळी प्र.चा.येथील पोलीस कर्मचारी नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. याच पोलिसाच्या संपर्कात आलेला कंपाउंडर हा कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट आज आला आहे.

टाकळी प्र.चा. येथील बाधीत पोलीसाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले होते. यात त्यापैकी पोलिसाने उपचार घेतलेल्या, खाजगी रुग्णालयातील २२ वर्षीय कंपाऊडरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा तपासणीचा अहवाल आज प्राप्त झाल असून तो पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी दिली आहे.

तर टाकळी प्र.चा.व कळमडू येथील बाकींच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. आता चाळीसगाव तालुक्यात कोरोना बांधितांची संख्या सहावर जावून पोहचली असून नागरिकांना खबरादरी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version