Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : फैजपूरात नगरपालिकेतर्फे तपासणी मोहीम

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर फैजपूर नगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सीजन व पल्स तपासणी मोहीम राबाविण्यात येत आहे.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी तोंडाला मास्क लावा, हात धुवा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका घरातच रहा, या सूचना वेळोवेळी प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. त्यांचे पालन करावे, बाहेरगावाहुन आपल्याकडे कुणी आल्यास प्रशासनास कळवा. शहरात नागरिकांची थर्माल स्कॅनीग व ऍक्सिमीटर द्वारे ऑक्सिजन व प्लस तपासणी करण्यात येत आहे. गावातील सुभाष चौक, मोठा मारुती, लक्कड पेठ, तूप बाजार या भागासह संपूर्ण गावात नागरिकांची तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत गुरुवारी सकाळी सुभाष चौकात मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे सोबत पालिका कर्मचारी शिवा नेहेते, लक्ष्मण चावरे, लाला फेगडे, सुधीर चौधरी आदी सहभागी होते. नागरिकांनी घरीच राहावे सुरक्षित रहावे, असे, आवाहन नगरपालिकाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version