Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना प्रतिबंध लस केंद्रांवर रवाना (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । बहुप्रतीक्षित कोरोना लसीकरण जिल्ह्यात प्रत्यक्षात १६ तारखेपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील केंद्रावरून करोना प्रतिबंध लस केंद्रांवर रवाना करण्यात आली.

प्रतिबंध लसीकरणासाठी पहिला टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्करची निवड करण्यात आली असून त्यात सरकारी व खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह कोरोना रुग्णांच्या समोर जाऊन तसेच शेवटच्या पातळीवर जाऊन काम करणाऱ्या आरोग्य व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात २४ हजार ३२० कोरोना लस जिल्ह्यात येत आहेत. सध्या ६० टक्के कर्मचाऱ्यांना लसीकरण होईल. सुरुवातीस ९ केंद्रावर लस देण्यात येतील. प्रत्येक केंद्रावर १०० जणांचे लसीकरण केले जाणार आहे. ८ जानेवारी रोजी कोवीड लसीकरणाबाबतची रंगीत तालीमही “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय” मध्ये झाली आहे. जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रातील १४ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहेत. एक लस हि ५ एमएलची असेल. एका कुपीत १० डोस अशी कोविशील्डची रचना आहे. आज दुपारी अडीच वाजता केंद्रांवर लस रवाना करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते.

१६ जानेवारी रोजी जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा या तीन उपजिल्हा रुग्णालयात, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयात तर जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय, जैन रुग्णालय,शिवाजीनगर असे एकूण नऊ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांनी लाइव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले.

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली सिरम इन्स्टिट्यूट, पुणेची “कोविशील्ड” लस हि जळगाव शहरात बुधवारी १३ रोजी संध्याकाळी ७ वाजता पोहोचली. कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह पाहणी करून जागा निश्चिती केली. पहिल्या दिवशी जिल्ह्यात ९ केंद्रावर प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यावर उपाय म्हणून पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने “कोविशील्ड” लशीची निमिर्ती केली आहे. जळगाव जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. कोव्हीशिल्ड लस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली औषधशास्त्र निर्माण विभागात अधिक्कारी सुरेश मराठे यांनी तपासणी करून ताब्यात घेतले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पहिल्या दिवशी वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात १०० कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कोविशील्ड लस दिली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांचा डाटा ठेवून त्यांना पुन्हा २८ दिवसांनी लसीकरण केले जाणार आहे.

Exit mobile version