कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन गरजेचे : संजय गरूड यांचे प्रतिपादन

शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील मौलाना आझाद पतसंस्था व अलफैज फाऊंडेशन जळगाव यांनी शेंदूर्णीतील नागरिकांचे रोगनिदान व मोफत औषधी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल कौतुक. अशा प्रकारे रोगनिदान शिबीराचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरूड यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.

माहेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित शिबिरात ४०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली व औषधींचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.करीम सालार होते. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव त्यावर अलफैज फाऊंडेशन करीत असलेलं कार्य याविषयी त्यांनी माहिती दिली. जळगाव शहरात आजपर्यंत ९ शिबिरात अनेक नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधी वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव येथिल डॉ.शरीफ शाह, डॉ. नसीम अन्सारी, डॉ.शोएब शेख, डॉ. जावेद देशमुख, डॉ.वसीम देशमुख, डॉ.अफाक सालार, डॉ.फारूक शाह, तर शेंदूर्णी येथील डॉ.दस्तगिर शेख, डॉ.अजय सुर्वे , डॉ.अलकेश नवाल यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी अलफैज फाऊंडेशन प्रमुख अजीज सालार, शाहिद मेंबर, व रउफ खान यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचा ४०० नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. शिबिरात जेष्ठ मार्गदर्शक उत्तमराव थोरात, शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पाणीपुरवठा अभियंता काझी , नगरसेवक गणेश पाटील अलीम तडवी,सतीश बारी,गणेश जोहरे, धीरज जैन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मौलाना आझाद पतसंस्था चेअरमन शेरू काझी यांनी केले तर शिबिर यशस्वी करण्यासाठी संचालक शेख हुसेन, निलेश थोरात, मनोज काबरा, शकील पिंजारी, सलीम खाटीक, जलाल सौदागर, पिंटू काझी,शेख मुखत्यार,रिजवान व व्यवस्थापक नज्जू काझी व पतसंस्था कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content