Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपूर्ण कुटुंबाची चाचणी करा !

 

जळगाव,प्रतिनिधी । शहरात घरातील एक व्यक्ती जरी कोरोना पॉझिटिव्ह आढळली तर त्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी असे निर्देश महापौर सौ.जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज दिले. महापौर दालनात बुधवारी सायंकाळी कोरोना उपायोजनांबाबतची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शहरातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, प्रभाग अधिकारी इतर कर्मचारी उपस्थित होते. 

 

६० वर्षावरील रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या मृत्यूचे एक मुख्य कारण म्हणजे कोरोना सारखा आजार नागरिक अंगावर काढतात. यामुळे शहरातील वयाने साठ वर्षाहून अधिक असलेले नागरिक जर कोरोना पॉझिटिव्ह आले तर त्यांना गृह विलगीकरणामध्ये न ठेवता त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेणे. जेणेकरून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार होतील आणि ते बरे होतील अशी सूचना यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली.

घाबरू नका, आम्ही डॉक्टरांच्या पाठीशी

गृह विलगीकरणाबद्दल रुग्णांचे नातेवाईक बऱ्याचदा गृह विलगीकरण करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकतात अशी तक्रार एका डॉक्टरने केली. यावेळेस महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचं कर्तव्य बजवा असे सांगितले.

संपूर्ण कुटुंबाची तपासणी करा

एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्या-आल्या त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची सुद्धा टेस्ट करण्यात यावी.  जास्तीत जास्त टेस्ट होतील आणि कोरोनावर अंकुश ठेवण्यात महापालिकेला यश मिळेल असे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले

लवकरात लवकर फवारणी करावी

शहरातील काही डॉक्टर आहेत जे होम आयसोलेशनचा फॉर्म भरून देत आहेत. त्यामुळे त्या डॉक्टर्सवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी काही डॉक्टरांनी केली. यावेळी महापौरांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला त्याच बरोबर काही नागरिकांकडून तक्रार आली होती की, ज्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडला त्या घरात वेळेवर जंतूंरोधक रोधक फवारणी होत नाही. यामुळे लवकरात लवकर ही फवारणी करायला हवी असे आदेश यावेळी महापौरांनी दिले.

 

Exit mobile version