Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : पिकं कापण्यासाठी शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये सुरक्षितरीत्या सूट द्यावी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकर्‍यांचे कंबरडे अक्षरशः मोडले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकं कापण्यासाठी शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये सुरक्षितरीत्या सूट द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

 

राहुल गांधी म्हणाले की, रब्बी हंगामातील पिकं शेतात उभी राहिलेली असून, लॉकडाऊनपायी कापणीचे काम कठीण झाले आहे. यामुळे शेकडो शेतकर्‍यांची उपजीविका धोक्यात आली आहे. देशातील अन्नदाता शेतकरी आज या दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने रब्बी हंगामातील पिकं कापण्यासाठी शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये सुरक्षितरीत्या सूट द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. परंतु मोदी सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

Exit mobile version