Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी टाटा समूहाकडून ५०० कोटींची मदत !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनासोबत लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपयाची मदत करणार आहेत. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

 

 

टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी आपत्कालीन संसाधने लवकरात लवकर पुरवावीत. करोनाचे संकट हे मानवजातीसमोरील अत्यंत कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी यापूर्वी देशाच्या गरजा भागवल्या आहेत. सध्याचे संकट हे मानवी शर्यतीतील भेडसावणार्‍या कठीण आव्हानांपैकी एक आहे. यापूर्वी वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी देण्याची घोषणा केली होती. तर महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी एका महिन्याचा पगार देणार असल्याचे म्हटले होते. यापूर्वी वेदांत ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी एका महिन्याचा पगार देणार असल्याचे सांगितले होते. तर पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

Exit mobile version