Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : पंतप्रधान मोदींनी केली माजी राष्ट्रपती,पंतप्रधानांसह विरोधकांशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूविरोधात सुरू असलेल्या लढाईअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राजकीय पक्ष आणि समाजातील प्रत्येक वर्गाला एकाच मंचावर आणण्याच्या प्रयत्नात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधानांसह देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा केली.

 

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला करणाऱ्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. त्यांच्या व्यतिरिक्त समाजवादी पार्टीचे (एसपी) ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे (बीजद) सुप्रीमो आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, द्रमुक प्रमुख एम.के. स्टालिन, तसेच तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याशीही मोदी फोनवर बोलले. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांनाही त्यांनी फोन केला. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे कळते.

Exit mobile version