Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : नवीन पाच प्रयोगशाळा उघडणार ; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही. नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच राज्यात काही दिवसात 4 ते 5 ठिकाणी प्रयोगशाळा वाढविण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.

 

टोपे म्हणाले की, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणच्या केवळ तीनच प्रयोगशाळांमार्फतच करोना विषाणूग्रस्तांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, या प्रयोगशाळांवरील वाढता ताण लक्षात घेता मुंबईतील केईएम रुग्णालय, जे. जे. रुग्णालय आणि हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणीही करोनाच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. बहुधा पुढील पाच दिवसांत ते आपले काम सुरु करतील. त्याचबरोबर राज्यातील विविध भागांमध्येही यासारख्या प्रयोगशाळा सुरु करण्यात येतील अशी माहितीही त्यांनी दिली.

Exit mobile version