Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : धरणगाव शिवसेनेच्या वतीने गरजूंना खिचडी वाटप !

 

धरणगाव (वृत्तसंस्था) कोरोना विषाणुच्या संकटाने देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू शकणार नाहीय. या परिस्थितीत हातावर पोट असलेले, भिक्षेकरींसाठी उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अशा गरजवंतांची उपासमार होऊ नये यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व शहर शिवसेना शाखेच्या वतीने शहरातील विविध भागात अन्नदान करण्यात येत आहे.

 

पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख मा.गुलाबरावजी वाघ,उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील यांच्या आदेशानुसार आज लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी व माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक वासुदेव चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्या हस्ते गरजूंना सकाळी चहा-नास्ता,रात्री जेवण वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून शहरातील रेल्वे स्टेशन, उड्डाण पूल, ग्रामीण रुग्णालय यासह जिथे गरजुंकडून विनंती करण्यात येत आहे, तेथे खिचडी वाटप करण्यात येत आहे. आज खिचडी वाटप करतांना आज रोजी गटनेते पप्पु भावे,नगरसेवक विजय महाजन,माजी उपनगराध्यक्ष करण वाघरे, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री,रवींद्र जाधव,कार्यालय प्रमुख विनोद रोकडे,भारतीय विद्यार्थी सेना शहरप्रमुख पराग चव्हाण,पापा वाघरे,कमलेश बोरसे,समाधान पाटील (भासा),विशाल चौधरी,अमोल चौधरी,अरविंद चौधरी,गोपाल पाटील,समाधान पाटिल,गोपाल चौधरी,मनीष चौधरी व सर्व शिवसेनेचे जीवनावश्यक वस्तू पुरवणारा चमू उपस्थित होता.

 

गुणवत्ता आणि पौष्टिकता आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष

 

शिवसेनेकडून वाटप होत असलेल्या खिचडीची गुणवत्ता आणि पौष्टिकता आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाते. यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ स्वयंपाकघराची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे स्वयंपाक करणारे कर्मचारीही स्वच्छतेच्या सर्वच नियमांचे पालन करतात. सॅनिटायजेशन नंतरच या कर्मचाऱ्यांना स्वयंपाकघरात एंट्री असते. त्यामुळे गरजूंना पौष्टिक खिचडी मिळत आहे. दरम्यान, खिचडी वाटप करतांना मास्क, हँड ग्लोव्ह, सॅनिटायजर याचा वापर केला जात आहे. याशिवाय एक मिटर अंतरांवरूनच पॅकेटचे वाटप केले जात आहे.

Exit mobile version