Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना: दिव्यांगांना मिळणार १ महिन्याचे घरपोच रेशन आणि ॲडव्हान्स पेन्शन

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याने दिव्यांग बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन घरपोच आणि पेन्शन ॲडव्हान्स देण्याचा निर्णय रामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार असून, यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल असे आरोग्यविषयक साहित्याचाही समावेश असणार आहे. पेन्शन लाभार्थी दिव्यांगांना एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्यात यावी असाही निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे करोनाच्या लढाईत सर्व दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

याशिवाय ज्या ज्या ठिकाणी ‘कम्युनिटी किचन’ किंवा तत्सम सुविधा सुरू आहेत किंवा प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी गरजू दिव्यांग व्यक्तींना घरपोच जेवण/नाष्टा डबे पुरविण्यात येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींना बँका, पतसंस्था किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांमध्ये विनारांग सुविधा देण्यात याव्यात असेही या निर्णयाद्वारे निर्देशित करण्यात आले आहे. मनोरुग्ण, बेवारस किंवा निराश्रित असलेल्या व्यक्तींची सोय स्थानिकच्या शेलटर होम, आश्रम किंवा बालगृहात करण्यात यावी असेही निर्देश या निर्णयाद्वारे देण्यात आले आहेत. तसेच, लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार असून, यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल असे आरोग्यविषयक साहित्याचाही समावेश असणार आहे. हे आरोग्यविषयक साहित्य त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक दिव्यांग कल्याण निधीतून पुरविण्यात यावे असेही सूचित करण्यात आले आहे. दरम्यान या निर्णयासोबतच दिव्यांगांसाठी लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी राज्यातील सर्व महत्वाच्या शासकीय कार्यालये, पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांकांची यादीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Exit mobile version