Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात ४० रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; ६३ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज ४० रूग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर ६३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कालप्रमाणे आज देखील एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – २२, जळगाव ग्रामीण- १, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-२, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर -०, पारोळा- ०, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४० रूग्ण बाधित आढळले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ८३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ४५१ रूग्ण कोरोना रूग्णालयात उपचार घेत आहे तर ५३ हजार ८२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version