Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज ८० कोरोना रूग्ण आढळले; ३६ रूग्ण झाले बरे

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या कोरोना अहवालात आज ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३६ रूग्णांनी कोरोनावर मात केले आहे. जिल्ह्यातील ८ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – २७, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-६, अमळनेर-०, चोपडा-१८, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर-१०, पारोळा-२, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-१४, बोदवड-० असे एकुण ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५५ हजार ७९५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार ३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४३३ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. आजच भुसावळ तालुक्यातील तीन रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version