Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज ६२ रूग्ण आढळले; ७४ रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । कोरोना अहवालात आज ६२ रूग्ण बाधित आढळून आले आहेत तर ७४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच्या अहवालात जिल्ह्यातून चार तालुके निरंक आढळून आल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातून धरणगाव, एरंडोल, पारोळा आणि बोदवड हे तालुक निरंक आहेत तर इतर तालुक्यांचा विचार केला असता जळगाव शहर- १२, जळगाव ग्रामीण-४, चाळीसगाव-७, भुसावळ-१४, अमळनेर-३, चोपडा-७, पाचोरा-१, भडगाव-१, यावल-२, जामनेर-१, रावेर-७, मुक्ताईनगर-२ आणि इतर जिल्हे १ असे एकुण ६२ रूग्ण कोरोना बाधित निघाले.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५३ हजार ४२१ रूग्ण बाधित आढळून आले तर ५१ हजार ४२१ रूग्ण कोरोनामुक्त झालेत. सुदैवाने आजही कालप्रमाणे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. उर्वरित ६४८ रूग्ण उपचार घेत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Exit mobile version