Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज ५७ बाधित रूग्ण आढळले; ३१ रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ५७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३१ रूग्ण कोरोनामुक्त होवून परतले आहे. आज जिल्ह्यातील ६ तालुके निरंक आढळून आले असून एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आजची आकडेवारी
पाचोरा, भडगाव, धरणगाव, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात निरंक आढळून आले आहे. जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-८, अमळनेर-६, चोपडा-३, यावल-१, एरंडोल-१, रावेर-८, पारोळा-५, चाळीसगाव-३, इतर जिल्ह्यातील -३ असे एकुण ५७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५५ हजार ४५८ बाधित रूग्ण आढळले आहे. तर ५३ हजार ७५२ रूग्ण कोरोनामुक्त झालेत तर ३८७ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णाची मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version