कोरोना ; जिल्ह्यात आज ४ तालुक्यांमध्ये ६ नवे रुग्ण , २६ जण बरे झाले !

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यात  ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज  शहरासह ११ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

तालुकानिहाय आकडेवारी

 

जळगाव शहर- ०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ- १,  अमळनेर-२, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०,  यावल- ०,  एरंडोल -०,  जामनेर- १, रावेर – ०, पारोळा -०, चाळीसगाव- २, मुक्ताईनगर-०, बोदवड -०, इतर जिल्हे  ०  असे एकुण  ६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

 

 

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार आजपर्यंत एकुण १ लाख  ४२ हजार ४७५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ६ ६४  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २३७  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज १ १ तालुका निरंक आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

 

Protected Content