Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज ४२ रूग्ण बाधित आढळले; ४५ रूग्ण झाले बरे

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या आजच्या अहवालातून जिल्ह्यात ४२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ७ तालुके निरंक आल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव ग्रामीण, अमळनेर, चोपडा, यावल, एरंडोल, जामनेर आणि बोदवड तालुक्यातील रूग्ण संख्या निरंक आली आहे. तर जळगाव शहर- २८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-९, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-२, रावेर-१, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-१ असे एकुण ४३ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील रूग्ण संख्या ५५ हजार ३२८ बाधित रूग्ण आढळले आहे. यातील ५३ हजार ६३७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ३५४ रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज एकाही बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version