Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज ४० रूग्ण बाधित आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज आठ तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. जिल्ह्यात एकुण ४० रूग्ण आढळून आले असून ७० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज एकाही बाधित रूग्णाचा मृत्यू झाला नाही.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-२, भुसावळ-५, चोपडा-२, पाचोरा-८, जामनेर-१६, रावेर-२, पारोळा-१ आणि बोदवड-४ तर जळगाव ग्रामीण, अमळनेर, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर तालुके निरंक असून एकुण ४० रूग्ण आढळले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५३ हजार ६२९ कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५१ हजार ८३० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ५२७ रूग्ण उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णाची मृत्यू झाला नाही. एकुण १ हजार २७२ रूग्णाचा आजवर मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Exit mobile version