Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज ३० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले; ६७ रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यातून ३० रूग्ण कोरोनाबाधित आढळले असून ६७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच आज जिल्ह्यातील आठ तालुके हे निरंक‍ असल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी
निरंक तालुके – चोपडा, पाचोरा, भडगाव, एरंडोल, रावेर, पारोळा, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाही. तर उर्वरित जळगाव शहर-३, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-३, धरणगाव-१, यावल-२, जामनेर-१४, बोदवड-५ असे एकुण ३० रूग्ण बाधित आढळले आहे.

जिल्ह्यात आजच्या आकडेवारीनुसार ५३ हजार ६९७ रूग्ण बाधित आढळून आले आहे. यापैकी ५१ हजार ९८१ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे आणि ४४२ रूग्ण उपचार घेत आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकुण १ हजार २७४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ९६.८० टक्क्यांवर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Exit mobile version