Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज २७ रूग्ण बाधित आढळले; २८ रूग्ण झाले बरे

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या आजच्या अहवालातून जिल्ह्यात २७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज तब्बल १० तालुके निरंक आल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी

भुसावळ, चोपडा, पाचोरा, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील रूग्ण संख्या निरंक आली आहे. तर जळगाव शहर- १४, अमळनेर-३, भडगाव-२, धरणगाव-२, चाळीसगाव-५ असे एकुण २७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील रूग्ण संख्या ५५ हजार ३५५ बाधित रूग्ण आढळले आहे. यातील ५३ हजार ६८५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ३५३ रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज एकाही बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version