Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज १ बाधित रूग्ण आढळला

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जळगाव शहरातून एक रूग्ण आढळून आला आहे. जिल्हात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता सध्या ५ ॲक्टीव रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version