Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने ४२८ रूग्ण आढळले; ५२६ झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने शुक्रवार सायंकाळी दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात तब्बल ४२८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून १३१ रूग्ण आढळून आले असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून आज ५२६ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

 

जळगाव शहर-१३१, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-५०, अमळनेर-४१, चोपडा-८०, पाचोरा-१ भडगाव-१३, धरणगाव-३, यावल-१२, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-०, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४२८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ५४७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ८३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार १२७ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८२ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Exit mobile version