Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज दोन बाधित रूग्ण आढळले !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २  कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज जळगाव शहर एक तर भुसावळ तालुक्यातून एक असे दोन बाधित रूग्ण आढळून आला आहे. तसेच भुसावळ तालुक्यातील एका कोरोना बधीताचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७६०  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार१७१  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जिल्ह्यात १२ बाधित रूग्ण असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Exit mobile version