कोरोना : जिल्ह्यात आज आढळले चार कोरोना बाधित रुग्ण

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात चार कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात भडगाव तालुक्यातील दोघे तर रावेर व पारोळा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

 

आज दिवसभरात चार कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५४१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९४४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या ६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content