Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही; एक रूग्ण झाला बरा !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरातून एकही कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. आता जिल्ह्यात १४ ॲक्टीव रूग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार १८४ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजवर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version