Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रूग्ण आढळला नाही

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयात आज पाठविलेल्या कोरोना अहवाल दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर दिवसभरातून दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नसल्याने जिल्ह्यातला दिलासा मिळाला आहे. सोबत आज जिल्ह्यातून २ संक्रमित असलेले रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आज १ लाख ४२ हजार ७३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १५६  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर जिल्ह्यात ४ संक्रमित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण २ हजार ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Exit mobile version