Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयात पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राकन्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळला नाही . जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८१५ रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २२७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ९ ॲक्टीव रूग्ण उपचार घेत आहे. तर एकुण २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राकन्वये कळविले आहे.

Exit mobile version