Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज आढळले चार कोरोना बाधित रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात चार  बाधित रुग्ण आढळले  असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

जिल्ह्यात आज चार  रुग्ण आढळून आले आहेत. यात भुसावळ, अमळनेर, रावेर व चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी एक असे चार रुग्ण आढळून आले आहेत.    जिल्ह्यात आजपर्यंत १  लाख ४२  हजार ७४१  बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी १  लाख ४०  हजार १५८  रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्याचप्रमाणे २  हजार ५७५  रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या आठ  रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Exit mobile version