Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना जिल्ह्यातून परतीच्या मार्गावर ; आज फक्त ३ रुग्णांचे निदान

जळगाव,  प्रतिनिधी ।  आता कोरोना जिल्ह्यातून जवळपास परतीच्या मार्गावर दिसत आहे . आज जिल्ह्यात फक्त ३ नव्या  रुग्णांचे निदान झाल्याने या संकटातून बाहेर पडण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे तथापि गाफील राहून चालणार नाही असे अजूनही आरोग्य क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत कारण हा उत्परिवर्तन होणारा विषाणू थोड्याही चुकीमधून पुन्हा घाव घालू शकतो.

 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ३  संक्रमित रूग्ण आढळून आले असून  ९  बाधित रूग्ण बरे झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

 

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-०, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-०, अमळनेर-१, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५५५  रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ८८६  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकाही बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतायर्पंत २ हजार ५७५ बाधित रूग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Exit mobile version