Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जागतिक आरोग्य संघटनेकडून पाकचे कौतुक

 

लंडन ,वृत्तसंस्था । कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने भारताचा शेजरी असणाऱ्या पाकिस्तानचे कौतुक केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी पाकिस्तानबरोबरच अन्य सात देशांच्या नावांचा उल्लेख करत या देशांकडून साथीच्या आजारांशी कसं लढावं हे शिकलं पाहिजे असं सांगत पाकिस्तान सरकारने आखलेल्या योजनांचे आणि धोरणांचे कौतुक केले

पाकिस्तानने पोलिओचे डोस देण्यासाठी प्रशिक्षण दिलेल्या स्वयंसेवकांचा वापर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी पद्धतीने केल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या स्वयंसेवकांच्या मदतीने पाकिस्तानमध्ये रुग्णांचे कॉनटॅक्ट ट्रेसिंग आणि उपचारासंदर्भातील काम करण्यात आलं. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र आहे.

पाकिस्तानबरोबरच थायलंड, कंबोडिया, जपान, न्यूझीलंड, कोरिया, रवांडा, सिनेगल, इटली, स्पेन आणि व्हिएतनामसारख्या देशांनाही प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात चांगले काम केले आहे, सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये असणाऱ्या युरोपमधील इटलीसारख्या देशाने काही कठोर निर्णय घेत करोना संसर्गाचा वेग कमी केल्याचे ट्रेड्रोस यांनी सांगितलं. पाकिस्तानमधील एकूण करोनाबाधितांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. पाकिस्तानमध्ये करोनामुळे आतापर्यंत सहा हजार ४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version