Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना: चैत्र वारीसाठी भाविकांनी पंढरीत येऊ नये; वारकरी संप्रदायाचे आवाहन

पंढरपूर वृत्तसंस्था । करोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक पाहून चैत्र वारीसाठी कोणीही दिंडी तसेच वैयक्तिक देखील पंढरीत येऊ नये, असे आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष हभप देवव्रत महारज वासकर आणि महाराज मंडळीनी केले आहे.

चैत्र वारीचा मुख दिवस म्हणजेच चैत्र एकादशी ४ एप्रिल रोजी आहे. “माझ्या जीवाची आवडी..पंढरपुरा नेईन गुढी” या अभंगाप्रमाणे लाखो वारकरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. वारकरी संप्रदायात आषाढ, कार्तिक, माघ आणि चैत्र या चार वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. दरवर्षी न चुकता वारीसाठी पंढरीला येणारे भाविक आहेत या चारही वारी साठी राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने दिंडी घेवून पायी पंढरीला येतात.

मात्र सध्या देशावर करोनाचे संकट घोंघावत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनता कर्फ्यु पुकारला आहे.करोना हा जनसंपर्कातून पुढे फैलावतो.त्यामुळे सरकारने लोकाना एकत्र येऊ नये असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर वारकीरी संप्रदाय पाईक संघटनेचे ह.भ.प.देवव्रत महारज वासकर, जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज हभप चैतन्य महारज देहूकर, श्रीसंत नामदेवरायांचे वंशज हभप निवृत्ती महाराज नामदास, हभप रामकृष्ण हनुमंत महारज वीर, हभप भाऊसाहेब महराज गोसावी यांच्या उपस्थितीत बैठक घेवून वारकर्यांनी पंढरीत येऊ नये, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version