Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना: चाळीसगावात दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद (व्हिडिओ)

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरात स्वयंस्फूर्तीने सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच पत्रकार यांच्यावतीने कोरोनाव्हायरसचा शिरकाव टाळण्यासाठी व साखळी तोडण्याच्या हेतूने दि. १ ते ३ मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज कर्फ़्युचा दुसऱ्यादिवशी देखील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला.

आजच्या दुसऱ्या दिवशीही चाळीसगावकरांमार्फत १००% प्रतिसाद जनता कर्फ़्युला मिळाला. संपूर्ण शहर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात चाळीसगावकरांचे कौतुक होत आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यात चाळीसगाव तालुकावाशी नक्कीच यशस्वी होतील अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, चाळीसगावकर यांनी कोरोना या व्हायरसला हरविण्याच्या लढ्यात यशस्वी होण्याचा निर्धार केला आहे. आता पुढील काळात देखील या शिस्तीचे पालन करतील अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहेत. यात पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, माजी सैनिक, होमगार्ड व स्वयं सेवी संस्था यांचे मोठे योगदान मिळत असल्याने आज चाळीसगावकरांचा हा जनता कर्फ्यू कौतुकाचा विषय ठरला आहे.

 

लिंक

Exit mobile version