Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाशी लढण्यासाठी खासदारांची ३० टक्के पगार कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

 

कोरोनाशी लढता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तूर्तास १२ महिन्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला सून या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे, असेही जावडेकर यांनी सांगितले.

Exit mobile version