Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना: कासमवाडीतील आठवडे बाजार आज बंद

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शहरातील कासमावाडी येथे भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. आठवडे बाजारात एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

कोरोना आजाराने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यासह राज्यात भरणारे धार्मीक स्थळे, सरकारी कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये, देशी दारूची दुकाने आणि खाद्य दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान शहरातील कासमवाडी येथील दर शनिवारी भरणारा आठवडे बाजारही सक्त बंद ठेवण्याचे आदेश असल्याने आज कासमवाडी येथील आठवडे बाजाराचे मैदानावर एमआयडीसी पोलीसांनी पाहणी केली. यावेळी कोणत्याही भाजीविक्रेता दिसून आला नाही.

Exit mobile version