Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही ;जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अन्य विषाणूंप्रमाणे करोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख मायकल जे रेयान यांनी दिला.

मायकल जे रेयान म्हणाले की, एचआयव्हीचा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. एचआयव्हीचा विषाणू आजही अस्तित्वात आहे. त्याचपद्धतीने कोरोना व्हायरस नेमका कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही. त्यामुळे आपण वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. तूर्त कोरोना व्हायरसचा आजार कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही, असेही रायन म्हणाले.

Exit mobile version