Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना अहवाल निरंक असेल तरच दिल्लीत प्रवेश

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या महाराष्ट्रास पाच राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यावरच दिल्लीत प्रवेश देण्याचा निर्णय दिल्लीच्या  केजरीवाल सरकारनं घेतला आहे.

 

महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.

 

कोरोनाच्या तीन लाटांमधून बाहेर पडलेल्या दिल्लीत पुन्हा कोरोना बळावू नये, यासाठी केजरीवाल सरकारनं विषाणूला वेशीवर रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्यात आहेत.

 

 

 

दिल्ली सरकारने महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यातून येणाऱ्या नागरिकांकडून निगेटिव्ह रिपोर्ट असल्यावरचं दिल्लीत प्रवेश करू देण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे.

 

 

देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ७४२ जणांना  संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून निष्पन्न झालं आहे. तर १०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १०४ मृतांबरोबरच देशातील  मरण पावलेल्यांची संख्या १,५६, ५६७ इतकी झाली आहे. २४ तासांच्या कालावधीत १४ हजार ३७ जण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

Exit mobile version